पोलिस व गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईत १० क्विटल गोवंश मांस जप्त

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : जनावरांच्या कत्तल खाण्यावर गुन्हा अन्वेषण विभाग व फुलंब्री पोलिसांनी सकाळी पाच वाजता कारवाई केली.
८ ते १० क्विंटल गोवंश मांस जप्त करून जनावराचे हजारो कातडी जप्त केली आहे. पहाटे चार पासुनच ही कारवाई सुरू झाली ती सातपर्यंत म्हणजे १५ ते १६ तास ही कारवाई सुरू होती. येथील मांस व कातडी मोठ्या हे प्रमाणात असल्याने उचलण्यास माणसे भेटत नव्हती,  म्हणून तब्बल १५ ते १६ तास ही कारवाई चालली. 

संभाजीनगर शहरात खाटीक गोवंश कापत नाही. यामुळे संभाजीनगर येथून गोवंश मांस घेण्यासाठी फुलंब्रीत सकाळी चार पासूनच येतात ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरीष्ठाचे मार्गदर्शन घेऊन गुन्हा अन्वेषण विभाग व स्थानिक पोलीस यांनी सकाळी चार पासुनच खाटीक खाना परीसरात गस्त घातली व छापा मारला मोठ्या प्रमाणात मांस जप्त केले. तर शेजारीच असलेल्या गोदामात हजारो कातडी जप्त करण्यात आली. या सर्वाची गणना व मांस किती क्विंटल आहे, याची खात्री लवकर होईल म्हणून ही कार्यवाही १६ तास ही सुरू होती.